वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
निवडणूक वृत्त विश्लेषण….
राळेगाव : नगर पंचायत राळेगांव च्या निवडणूकीत सुरुवाती पासून तर शेवटच्या दिवसा पर्यंत त्रिमूर्तींचे अथक प्रयत्न,परिश्रम काँग्रेस पक्षा साठी नवसंजीवनी देणारे ठरले असं म्हणणं वावगं ठरणार नाही. काँग्रेस पक्ष यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अरविंद वाढोणकर,राळेगांव तालुका अध्यक्ष अरविंद फुटाणे,शहर अध्यक्ष प्रदीप ठूणे यांनी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच याच ध्येयाने प्रेरित होऊन,उमेदवार निवडी पासून तर संपूर्ण प्रचार यंत्रणा प्रभावी पणे राबवून दोन्ही नेते सर आणि भाऊ यांना प्रत्येक प्रभागात तीन ते चारदा फिरवून,प्रमुख कार्यकर्ता मंडळी ना सोबत घेऊन,तब्बल अकरा जागा बहूमताने जिंकून,भाजपा सह अन्य राजकीय पक्षांना चारीमुंड्या चित केले आहे…

विशेष म्हणजे निवडून आलेल्या तीन अपक्ष उमेदवारां नी काँग्रेस पक्षाला सर्व बाबतीत बिनशर्त पाठींबा देऊन पुढील पाच वर्ष पक्षा साठी “बिना झंझटी चे”करुन दाखवलं आहे. सर्वदूर भाजपा चा दबदबा असताना,भाजपाच्या बहुतांश उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.तर काँग्रेस पक्षाचे उमेदवारां ची लढत शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष उमेदवारां शी च झाली आहे हे या वेळच्या निवडणूकीचे “खास वैशिष्ट्य”चं म्हणावं लागेल. या तीन नेत्यांनी कार्यकर्ता मंडळी,पक्षश्रेष्ठी,मतदार यांच्यात छान समन्वय ठेवल्याने यश आले. वादविवाद,रुसवेफूगवे सह इतर यशासाठी आड येणाऱ्या बाबी तिथल्या तिथे च मिटविल्याने,अकरा उमेदवारांना मोठं मताधिक्य मिळालं या खऱ्या विजयाचे शिल्पकार हे त्रिमूर्तीं चं आहे असे मत राजकीय जाणकार मंडळी नी व्यक्त केले आहे .

असेच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत जर समन्वय असला तर राळेगाव पंचायत समिती काँग्रेस ची राहील असी जनता बोलतानी दिसत आहे हे मात्र विशेष.


