सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम : कृषि महाविद्यालय रिसोड येथे अनुभव शिलतेतून व कृतीतून व्यापारी तत्त्वावरील काढनीनंतरचे व्यवस्थापन आणि बागायती पिकांचे मुल्यवर्धन (ELM HORT – 4814) सदर कार्यक्रम हा ८ व्या सत्रातील विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पार पाडला.या कार्यक्रमामध्ये सदर विदयार्थ्यांनी पपया जाम, टोमेटो केचअप, मिरची लोणचे, लिंबू लोणचे जेली, बटाटा चिप्स, केळी चिप्स इ. मुल्यवर्धीत पदार्थ बनवुन , त्याची कृती पॅकिंग, लेंबलींग व विक्रि केली. या उपक्रमास गुरुवारी रिसोड बाजार येथे उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. सर्व उपक्रमातील पदार्थ शास्त्रीय पद्धतीने बनविण्यास उद्यानविद्या विभागाचे सहा. प्राध्यापक श्री गणेश बाजड सर, प्र.स.नंदकिशोर थोरात यांनी योग्य ते मार्गदर्शन केले.
सदर उपक्रमास,कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. अप्तुरकर सर व समन्वयक श्री आर. एस. डवरे साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून उपक्रम यशस्वी करण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडली.
सदर उपक्रम सतत पुढे सुरू ठेऊन शेतमालाचे मुल्य-संवर्धन करून रोजगाराच्या संधी सदर विदयार्थ्यांना कशा प्राप्त करता येतील यासाठी सु.वि.दे. फाउन्डेशन रिसोड चे अध्यक्ष अंनंतराव देशमुख (मा.खासदार) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


