सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/देसाईगंज:- गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात कोंढाळा येथे आमचा गाव आमचा विकास कार्यक्रमाचे आयोजन 3 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले.गाव विकास आराखड्याबाबत उपस्थित मान्यवर,पदाधिकारी व गावकऱ्यांना माहिती देण्यात आली.सर्वप्रथम कार्यशाळा सुरू करण्यापूर्वी सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रार्थनेने सुरूवात करण्यात आली.यानंतर 15 व्या वित्त आयोगाची माहिती मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.आमचा गाव आमचा विकास कार्यशाळेचे प्रशिक्षक राजेश शंभरकर यांनी शासन स्तरावरून ग्रामपंचायतीला कशा प्रकारे निधी उपलब्ध केला जातो,बंधीत व अबंधीत निधीचे निकष काय,पेसा-नॉन पेसा कायदा काय,उमेद संघ व आयसीडीएस बद्दल माहिती व इतर योजनेविषयी माहितीपर मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे उद्घाटक रोशनी पारधी महिला व बाल कल्याण सभापती जिल्हा परिषद गडचिरोली तसेच कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत यांनी केले तर यशदा प्रशिक्षक राजेश शंभरकर प्रामुख्याने मार्गदर्शक होते.सदर कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती देसाईगंजचे सहाय्यक गट विकास अधिकारी एस.एम.थोटे,ग्रामपंचायत सचिव जी.एन.मडावी,उपसरपंच गजानन सेलोटे,पोलीस पाटील किरण कुंभलवार,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिभाऊ पत्रे,कुरुड ग्रामपंचायतीचे सदस्य शंकर पारधी,कुरुड जिल्हा परिषद हायस्कुलच्या मुख्याध्यापिका जयश्री पराते,रोजगार हमी योजना दक्षता समितीचे अध्यक्ष सत्यवान रामटेके,पंढरी नखाते,सद्स्य गोकुल ठाकरे,सदस्य शेषराव नागमोती,नलिता वालदे,कुरुड-कोंढाळा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यगण,कर्मचारी वृंद,शिक्षकवृंद,आशा महिला,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका व कुरुड-कोंढाळा येथील ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.