जिल्हा परिषद सदस्या रूपाली पंदिलवार यांचे आवाहन.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/आष्टी:-आष्टी परिसरातील शेतकऱ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांनी केले आहे.शेतकरी आयुष्यभर कष्ट करतो. मात्र, सुखी,समृद्धीच जीवन तर सोडा दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाले आहे.मागणी आहे तेच पिकविले पाहिजे.शेतीत यांत्रिकीकरणासारखे बदल करणे गरजेचे आहे.शेतकरी नव्हे तर उद्योजक म्हणून शेती करावी.चामोर्शी तालुक्यातील आष्टी परीसरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी स्वाधार योजने अंतर्गत सिंचन विहिरी मंजुर झाल्या असुन आष्टी येथील सिंचन विहिर खोदकामाचे भूमीपूजन गडचिरोलीच्या जिल्हा परिषद सदस्या रूपाली पंदिलवार यांचे हस्ते करण्यात आले.चामोर्शी तालुक्यातील आष्टी परीसरातील डाॅ.बाबासाहेब स्वावलंबी स्वाधार योजने अंतर्गत आष्टी, ईल्लूर,अनखोडा व सिंगमपल्ली येथे अनेक सिंचन विहिरी मंजुर झाले असल्याने आता या शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होणार असुन या शेतकऱ्यांनी या सिंचन विहिरीचा लाभ घ्यावा असे आवाहन गडचिरोली जिल्हा परिषद सदस्या रूपाली पंदिलवार यांनी केले.यावेळीं सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार,सुंदरदास उंदिरवाढे,आन॔दराव गलबले व आष्टी परीसरातील शेतकरी उपस्थित होते.


