सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/अहेरी:- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन 4511 संलग्न शाखा तालुका अहेरीची सभा 5 फेब्रुवारी रोजी राज्याचे अध्यक्ष विलास कुमरवार यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती अहेरी च्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले.सभेत अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध समस्या मांडण्यात आले.त्यात किमान वेतनाची अट रद्द करणे,नवीन शासकीय परिपत्रकानुसार वेतन घेणे, अपघात विमा लागू करणे.तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरणा करण्यात करण्यात आली नाही, किमान वेतनाची थकीत रक्कम अदा करण्यात आलेली नाही,राहणीमान भत्ता अदा करण्यात आलेला नाही, तालुक्यातील कर्मचारी आशा तुटपुंज्या वेतनात काम करीत असताना शासनाने ग्रामपंचायत कर्मचारी कोविड-19 च्या काळात जीवावर बेतून काम केल्याने प्रति महीना एक हजार रूपये देण्याचे शासन निर्णय निर्गमित झाल्याने कर्मचाऱ्यांचे आशा पल्लवित झाल्या होत्या.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा गाडा हाकण्यास मद्दत होईल असे वाटले होते.परंतु जिल्हा स्तरावरून,तालुका स्तरावरून आदेश निर्गमित होऊनही शासन आदेशाचे पालन केले जात नाही.अशाने कर्मचारी हवालदिल झालेला आहे.कर्मचाऱ्याचा मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तालुक्यातील सर्व कर्मचारी आप आपल्या कुटुंबासह पंचायत समिती समोर आमरण उपोषण करण्याचे एकमताने निश्चित झाले.सभेस राज्याचे अध्यक्ष विलास कुमरवार,नवनिर्वाचित गडचिरोली जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत कुणघाडकर व जिल्हा सचिव फालचंद जांभुडकर यांनी मार्गदर्शन केले.सभेस तालुका अध्यक्ष समया गुरजाल,उपाध्यक्ष विजु कावडे व तालुक्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक व संचालन अहेरी तालुका सचिव रघुनाथ औतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप राउत यांनी केले.











