लाहेरी परिसरातील नागरिकांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/भामरागड:-कर्करोग विषयी जागरुकता वाढवण्यासाठी आणि त्याचे प्रतिबंध,शोध आणि उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ओळखला जाणारा 4 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय दिवस आहे.जागतिक कर्करोग दिन 2008 मध्ये लिहिलेल्या जागतिक कर्करोग घोषणेच्या उद्दिष्टांना समर्थन देण्यासाठी युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) च्या नेतृत्वात आहे.जागतिक कर्करोग दिनाचे प्राथमिक उद्दिष्ट कर्करोगामुळे होणारे आजार आणि मृत्यू लक्षणीयरीत्या कमी करणे आणि कॅन्सर पासून बचाव करता येणार्या पीडितांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र आणण्याकरिता हा दिवस पाळला जातो.जागतिक कर्करोग दिनाची स्थापना 4 फेब्रुवारी 2000 रोजी पॅरिस येथे झालेल्या न्यू मिलेनियम फॉर कॅन्सर विरुद्ध जागतिक कर्करोग शिखर परिषदेत करण्यात आली.याच दिनाचे औचित्य साधून दि.4 फेब्रुवारी रोजी उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे मोठ्या उत्साहाने व्यसन मुक्त ग्राम अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात आश्रम शाळा लाहेरी येथील विद्यार्थ्यांच्या व्यसनमुक्ती रॅलीने झाली.रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती बद्दल जागरूकता निर्माण करणारे वेगवेगळे स्लोगन असलेली फलके हातात घेतली होती.रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती बद्दल घोषणा दिल्या.सदर रॅली लाहेरी येथील आश्रम शाळा येथे चालू होऊन बोगामी चौकात स्थिरावली कार्यक्रमाचे ठिकाणी मोठ्या उत्साहाने ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. लाहेरी येथील पोलीस उपनिरीक्षक महादेव भालेराव यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास जमलेल्या विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांनी लाहेरी येथील आश्रम शाळेचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बोरकर यांनी व्यसनमुक्ती बद्दल ग्रामस्थांमध्ये जागृकता निर्माण करून व्यसनाचे वाईट परिणामांची जाणीव करून देत व्यसनाधीनतेच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.सदरचा कार्यक्रम उपविभागीय पोलिस अधिकारी विभाग भामरागड चे नितीन गणापुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे यशस्वी ते करिता पोलीस स्टेशन लाहेरीचे प्रभारी अधिकारी आकाश विटे,पोलीस उपनिरीक्षक प्रशांत डगवार,संतोष काजळे,विशाल पगारे पोलीस हवालदार तुकाराम हीचामी,पोलीस अमलदार,मोहिंदर मानकर,प्रमोद गडेलवार,महिला पोलिस अंमलदार वैशाली चव्हाण,रेश्मा गेडाम,चंदा गेडाम,वर्षा डांगे,वृषाली चव्हाण तसेच एसआरपीएफ चे अंमलदार आदींनी परिश्रम घेतले.