गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : गोवा येथे ११ खेळाडूंनी मिळवले १४ पदक नॅशनल युथ ऑलम्पिक गेम फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने ३० जानेवारीला गोवा येथे झालेल्या नॅशनल गेम चॅम्पियनशिप मध्ये तेल्हारा येथील अकरा खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यामध्ये अकराही खेळाडूंना सुवर्ण तसेच कास्यपदक सह चौदा पदक मिळाले असता त्याचे तेल्हारा शहरात आगमन होताच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. गोवा येथे झालेल्या नॅशनल गेम चॅम्पियनशिपमध्ये तेल्हारा येथील अकरा खेळाडूंनी भाग घेतला होता त्यामध्ये त्यांना १४ पदक मिळाले सर्व नागरीकांना यामध्ये सिद्धी गणेश कारंडे १०० मीटर व लांब उडी मध्ये सुवर्णपदक मिळाले तसेच मल्हार गणेश कारंडे १०० मीटर व लांब उडीमध्ये सुवर्णपदक अर्जुन शंकर रसाळ १०० मीटर लांब उड़ी मध्ये सुवर्णपदक रोहित दादाराव पोहरकर २०० मीटर मध्ये याला कास्यपदक मिळाले उदित गिरिराज सैनी लांब उडी मध्ये सुवर्णपदक मिळाले मयूर लालसिंग मलिये यांना गोळाफेक मध्ये सुवर्णपदक मिळाले ऋषिकेश संतोष मानकर तीन हजार मीटर मध्ये सुवर्णपदक मिळाले शिवम अशोक घाटोळ ८०० मीटर मध्ये कास्य पदक मिळाले आकाश धनराज आढ़े ३००० मीटर मध्ये कास्य पदक मिळाले गणेश गजानन सोनोने ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळाले विनय विनोद ओहे ८०० मीटर धावण्याच्या शर्यती मध्ये रोप्य पदक मिळाले असे तेल्हारा येथील ११ खेळाडू नी १४ पदक मिळवून तेल्हारा शहरासह तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला या खेळाडू करिता क्रीडा शिक्षक म्हणून गेलेल्या शिक्षिका नीलम गणेश कारंडे यांना पण सर्वोत्तम क्रीडा शिक्षक पुरस्कार देण्यात आला याकरिता सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकांचे तेल्हारा शहरांमध्ये आगमन होताच त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये जंगी स्वागत करण्यात आले यावेळी आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी सदस्य तसेच क्रीडाप्रेमी युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.