पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिघी गडचिरोली.
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील राजाराम येते आदर्श क्लब यांचा वतीने ग्रामीण व्हाँलीबाल क्रिडा स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक माजी आमदार दिपक आत्राम तर दुसरा पारितोषिक जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व तिसरा पारितोषिक प.स.सभापती भास्कर तलांडे व पेरमिलीचे माजी सरपंच प्रमोद आत्राम असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले आहे.आज सदर स्पर्धेचे शेवट सामना झाला.असुन कोटापली प्रथम व दूसरा विजेता संघ आदर्श मंडळ राजाराम ठरला.आणि तिसरा विजेता संघ कालेश्र्वर.अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते प्रथम बक्षीस तर दूसरा बक्षिस राजाराम ग्रामपंचायतचे सरपंच नागेश कन्नाके यांच्या हस्ते करण्यात आले.व तिसरा बक्षीस अँड.हनमंत आकदर यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम चे माजी सरपंच संजय पोरतेट,नारायण चालूरकर,नामदेव पेंदाम,चंदूरशाही आलाम,पत्रकार रोशन कंबोगोनीवार, मंडळाचे अध्यक्ष वसंत सडमेक, संचालन जिल्हा परिषद केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक सुरेशचंद्र जुमनाके यांनी कार्यक्रमाचा सांगता करण्यात आले आहे.यावेळी मंडळाचे व गावातीला नागरीक उपस्थित होते.