वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव : नेहरू युवा केंद्र यवतमाळ अंतर्गत दिनांक 30 ते 31 जानेवारी ला दोन दिवशीय कब्बड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जवळपास तालुक्यातील 15 टीमनी सहभाग नोंदविला होता. झालेल्या रंगतदार कबड्डी सामन्यात प्रथम क्रमांक – परसोडी, द्वितीय क्रमांक – झरगड आणि तृतीय – राळेगाव तर चतुर्थ क्रमांक – झाडगाव टीमला मिळाला या मध्येच गोळा फेक आणि लांब उडी चे सुद्धा खेळ घेण्यात आले होत. प्रमुख पाहुणे म्हणून सौं. चंदाताई आत्राम, सरपंच ग्रामपंचायत झरगड, श्रावनसिंग वडते सर संचालक खरेदी विक्री संघ राळेगाव, मोहन आत्राम सर, सचिन राडे ग्रा. सदस्य झाडगाव, निखिल राऊत, मनोज आत्राम पोलीस पाटील, इ उपस्थित होते .खेळाचे परीक्षक म्हणून राजू राडे, प्रभाकर नेहारे, जीवन मेश्राम, रवी झाडें, राजू राऊत, रवी राऊत, मनोज पचारे, श्रमिक राडे आशिष लांभाडे इ. उपस्थित मान्यवरांच्या च्या यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, मेडल देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश रेंघे तर आभार मनोज पचारे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम,तसेच अनिल ढेंगे, नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या मार्गदर्शना मध्ये हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला .