अकोला,दि.31 – महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय दि. 28 जानेवारी 2022 नुसार सुधारित वाळू/रेती धोरण जाहिर झाले आहे. सुधारित धोरणानुसार नवीन अर्जदारांना संधी मिळावी याकरीता जिल्ह्यातील 30 रेती/वाळु घाटांच्या ऑनलाईन ई-लिलाव प्रक्रियेला मुदतवाढ देवून शनिवारी दि. 5 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.
सुधारित वाळु/रेती धोरणाच्या तरतुदीनुसार वाळुचे स्वामित्वधन सहाशे रुपये प्रति ब्रास नुसार ठरविण्यात आली आहे. तसेच नवीन अर्जदारांना संधी मिळावी याकरीता ऑनलाईन ई-निविदाची मुदत वाढवून शुक्रवार दि. 4 फेब्रुवारीपर्यंत तर ऑनलाईन ई-लिलाव शनिवार दि. 5 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. यापुर्वी जुना बाईडींग फार्म(biding form) रद्द करुन नवीन बाईडींग फार्म अपलोड करण्यात येणार आहे व त्यानुसार सन 2021-22 करीता जिल्ह्यातील 30 रेती/वाळु घाटांकरीता ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सुधारित वेळापत्रक याप्रमाणे :
- बुधवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता निविदाधारकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे बंद होईल.
- शुक्रवार दि. 4 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता ऑनलाईन ई-निविदा भरणे बंद होईल.
- शनिवार दि. 5 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन लिलाव सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत सुरु राहिल. लॉट नं.1 चे रेती घाट क्रमांक 1 ते 15 चे सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत लिलाव. दुपारी एक वाजता ई-लिलाव प्रक्रिया बंद होण्याआधी बोली प्राप्त झाल्यास 10 मिनीटाकरीता तीन वेळा ई-लिलाव प्रक्रियेची वेळ वाढविण्यात येईल. लॉट नं. 2 च्या घाट क्रमांक 16 ते 30 करीता दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत लिलाव. दुपारी चार वाजता ई-लिलाव प्रक्रिया बंद होण्याआधी बोली प्राप्त झाल्यास 10 मिनीटाकरीता तीन वेळा ई-लिलाव प्रक्रियेची वेळ वाढविण्यात येईल.
- शनिवार दि. 5फेब्रुवारी रोजी ऑनलाईन प्राप्त ई-निविदा दुपारी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे डाऊनलोड करुन उघडण्यात येतील. ई-निविदा आणि ऑक्शन यामध्ये जी किंमत जास्त असेल त्यास लिलाव मंजूर करण्यात येईल, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.