- 15 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा, दि. 1: महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास, बहुजन कल्याण विभागामार्फत वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येते. या योजनांकरीता विभागाच्या शासन निर्णय 27 सप्टेंबर 2021 नुसार जिल्हस्तरीय समिती स्थापन करावयाची आहे.
त्यासाठी सदर समितीच्या अध्यक्ष व सदस्य पदाकरिता प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत. प्रस्तृत समितीच्या अध्यक्ष पदाकरिता जिल्हयातील बंजारा समाजातील व्यक्ती, भटक्या जमाती प्रवर्गातील एक व्यक्ती आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील एक महिला सदस्य यांचे कडून दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहेत.
सदर समिती अध्यक्ष पदाकरिता व सदस्य पदाकरिता प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.










