बुलडाणा : जिल्हयातील माजी सैनिक, सैनिक विधवा व अवलंबित यांना महसूल संबंधित तसेच शेत रस्ता व जमीन विषयी काही तक्रारी /समस्या असल्यास 7 फेब्रुवारी 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे येवून तक्रार नोंदविण्यात यावी. तसेच कागदपत्रांची पुर्तता करावी. जेणेकरुन योग्य अशी कार्यवाही करता येईल, असे आवाहन सहा.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर निंबाजी पडघान यांनी केले आहे.