अकोला, दि.1 – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमान महाडिबिटी प्रणालीवरील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाकरीता विद्यार्थ्याकरीता शासनाव्दारे विविध योजना राबविण्यात येतात. या योजनाचा लाभ घेण्यासाठी दि. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी महाडिबीटीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिल राठोड यांनी केले.
अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाकरीता विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती योजना व व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता योजना राबविण्यात येत आहे. या योजनाकरीता माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत 2021-22 शैक्षणिक वर्षातील महाडिबिटी पोर्टलवर नविन व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यांत आली आहे. जिल्ह्यातील सर्व संस्था व महाविद्यालयाच्या प्राचार्य व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी महाडिबिटी पोर्टलवर मंगळवार(दि.15 फेब्रुवारी) पासून सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी दि. 15 फेब्रुवारीपर्यंत mahadbtmahait.gov.in या महाडिबीटी संकेतस्थळावर अर्ज करावा. विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची राहिल. तरी जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजनाचा लाभ घेण्याकरीता महाडिबिटी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.