अकोला, दि.1 – एकात्मिक बाल विकास सेवा योजना अकोला ग्रामीण 1 व 2 या प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदभरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व शासन निर्णयानुसार होणार आहे. पदभरतीकरीता कोणीही व कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये तसेच कुठल्याही अमिषाला बळी न पडण्याचे आवाहन एकात्मिक बाल विकास सेवा योजना अकोला ग्रामीण 1 व 2 चे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.