सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : तालुक्यातील उमरा देशमुख येथील राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्त मेहकर खरेदी विक्रीसंघाचे संचालक भागवतराव देशमुख,आणि जि.प.शाळेचे मुख्याध्यापक संजय हिरगुडे, यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट बिएलओ म्हणून विठ्ठल गावंडे यांचा सत्कार मेहकर येथे शाल श्रीफळ देऊन बुलढाणा जिल्हाचे लाडके खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. यावेळी खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, “शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो”, शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अखंड ज्ञानावर माझी श्रद्धा आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम शिक्षक करत असतो. शिक्षक म्हणजे ज्ञानाची विहीर व विद्यार्थी म्हणजे विहिरीबाहेर असलेला पोहरा आहे. ज्ञानाने विहीर भरलेली असेल तरच विद्यार्थ्यांच्या पोहऱ्यात ज्ञान मिळू शकेल, असे मत यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले.ते म्हणाले की, शिक्षकी पेशा हा उत्तम पेशा आहे. परंतु, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या मोहजालामुळे अनेक आव्हाने निर्माण झालेली आहेत. मुलांचे पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतील, तर शिक्षक हे मुलांचे दुसरे पालक आहेत. फुलाला सुगंध मातीचा, गाईला सुगंध वासराचा, गवयाला सुगंध गाण्याचा त्याचप्रमाणे शिक्षकांना सुगंध विद्यार्थ्यांचा. नीतिमूल्याने परिपूर्ण असे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे ते म्हणाले.’शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ शालेय अभ्यासक्रमाचे धडे न देता, मौलिक मूल्यांची, थोर विचारांची रुजवात करावी. त्यासाठी शिक्षकांनी अखंडित, चौफेर, विविधांगी वाचन करण्याची गरज आहे’ देव प्रत्येकाला कार्य करण्यासाठी पाचारण करतो. शिक्षकी पेशा हे देखील एक पाचारण आहे. शिक्षकी पेशा एक आव्हान आहे आणि ते आपण स्वीकारला हवे, असे मत खासदार प्रतापराव जाधव यांनी मांडले.यावेळी उत्कृष्ट बिएलओ म्हणून विठ्ठल गावंडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तर खरेदी विक्रीसंघाचे संचालक भागवतराव देशमुख आणि मुख्याध्यापक संजय हिरगुडे उपस्थित होते.


