किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,पुणे गट,पुणे विभाग संत तुकाराम नगर पिंपरी उद्यमनगर चिंचवड कार्यालयात स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी ७३ वा प्रजासत्ताक दिन कोरोना नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन करत निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः निमंत्रित पिंपरी चिंचवड प्रशासन अधिकारी प्रफुल्ल पुराणीक, डॉ.डी वाय पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ सोहम चितलांगे तसेच महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार पुरस्कार विजेते ह.भ.प.पुंडलीक झपके, गुणवंत कामगार ह.भ.प.यादव तळोले,गुणवंत कामगार ह.भ.प.शामराव गायकवाड, गुणवंत कामगार शिवाजीराव शिर्के, गुणवंत कामगार डॉ.मोहनराव गायकवाड, गुणवंत कामगार गोरक्षनाथ वाघमारे, गुणवंत कामगार सुदाम शिंदे, गुणवंत कामगार भरत शिंदे,गुणवंत कामगार सोमनाथ पतंगे,गुणवंत कामगार शंकरराव नाणेकर,गुणवंत कामगार विनोद सुर्वे व राजपूत संघटना शहराध्यक्ष ठाकूर शिवकुमारसिंह बायस या मान्यवरांनी ध्वज पुजन करून पोलीस उपअधीक्षक नवनाथ कुदळे चिंचवड स्टेशन यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ गुणवंत कामगार शिवाजीराव शिर्के हे उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणातून त्यांनी प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी याच दिवशी का साजरा करतात याविषयी माहिती देवून उपस्थीतांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्यमनगर केंद्र संचालक प्रदीप बोरसे यांनी करून,प्रास्ताविक संत तुकाराम नगर केंद्र संचालक सुरेश पवार केले व त्यांनी बोलतांना सांगितले की स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करतांना प्रजासत्ताक दिनी पिंपरी चिंचवड शहरात औद्योगिक वसाहतीत राहणा-या कामगारांसह त्यांच्या कुटूंबातील सभासदांना मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून अत्यल्प दरात चष्मे उपलब्ध करण्यात आले.तसेच देशाच्या संरक्षणासाठी सिमेवर लढणा-या जवानांकरीता पिंपरी चिंचवड रक्तपेढीचे डॉ.समीर जमादार,शंकर पाटील सह टिमच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरात एकूण ४२ कामगारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले व ५० कामगारांनी नेत्र तपासणी केली. रक्तदान करणा-या कामगारांना व नेत्र तपासणी केलेल्यांना राजपूत संघटनेचे शहराध्यक्ष ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र व चष्मे वाटप करण्यात आले. संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ मोहनराव गायकवाड सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येक कामगारांचे ऑक्सी मीटर व टेंम्प्रेचर गणने ऑक्सिजन लेवल व तापमान तपासणी साठी मोलाची मदत केली. कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार गुणवंत कामगार सुदाम शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ.संतोष रनावरे, डॉ.तमन्ना शेख,डॉ.ऐश्वर्या क्षिरसागर,शामल गाडेकर, मुस्कान शेख, लक्ष्मण डेबे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून गुणवंत कामगार संजय साळुंखे, सुर्यकांत बरसावडे, मोहम्मद बक्षीर मुलाणी व फुटबॉल कोच ऋषिकेश आसवले,कराटे कोच अभिषेक डांगे, शब्बीर मुजावर, मनोहर कड,नम्रता बांदल, विरेंद्र केळकर,मिनाक्षी येरूकर,वसंत दळवी,गौरी पेंडसे,संध्या स्वामी,अयुषा पै,शामल गाडेकर,प्रभाकर कोळी,रविंद्र अभंग,अरूणा भंडारी,अंकुश गायकवाड,मुस्कान शेख,हनुमंत जाधव,मुहम्मद मुलाणी,अश्विनी दहीतुले,माया कदम,शिवानी माळी,विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.