सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : दि.26 जानेवारी रोजी उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,समीर शेख,अनुज तारे यांच्या संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले.यावेळी शहीद गिरीधर नागो आत्राम यांच्या पत्नी छबुताई गिरीधर आत्राम रा. कोरेली(बु) यांच्या हस्ते सकाळी 07.15 वा.ध्वजारोहण करण्यात आले व त्यांनंतर आयोजित कार्यक्रमामध्ये शहिद पत्नी यांचा साडी देऊन सत्कार करण्यात आले. सदर कार्यक्रमाला व्यासपीठावर पेरमिली ग्रामपंचायत चे सरपंचा किरणताई नैताम,माजी सरपंच प्रमोद आत्राम,वरिष्ठ पत्रकार शंकर दुर्गे,पञकार श्रीनिवास बंडमवार,प्रभारी पोलीस उपनिरिक्षक धवल देशमुख,पोलीस उपनिरिक्षक गंगाधर जाधव,शंकर कुंभारे,श्रीकांत दुर्गे,उन्नती प्रभाग महिला संघाच्या वैशाली जीवने,सपना बंडमवार ग्रा.प.सदस्या,रजीता मुडावार,माऊली बहुउद्देशीय संस्था नागपूर, रोटरी क्लब नागपूर, लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर चे पदाधिकारी तसेच ग्राम पेरमिली येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी धवल देशमुख यांनी केले त्यांनी गडचिरोली पोलीस दलाचे वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. सिआरपीएफ चे संतोष कुमार,पेरमिली चे माजी सरपंच प्रमोद आत्राम,वरिष्ठ पत्रकार शंकर दुर्गे व चैताली देशमुख यांनी प्रजासत्ताक दिनाबाबत मनोगत व्यक्त केले. माऊली बहुउद्देशीय संस्थेचे सुहास खरे सर यांनी अतिदुर्गम भागामध्ये त्यांच्या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती दिली. रोटरी क्लब व लाईफ लाईन ब्लड बँक नागपूरचे वरभे यांनी रक्तदान बाबत व नेत्र तपासणी बाबत मार्गदर्शन केले, सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस अंमलदार राकेश उरवेते यांनी केले.