किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित आमदार म्हणून नितीन बापू देशमुख निवडून आल्यानंतर त्यांनी गेल्या पाच दशकांपासून या बाळापुर मतदारसंघातील जो खार पाण पट्ट्या चा भाग आहे यामध्ये प्रामुख्याने अकोला जिल्ह्यातील शेवटचं गाव काजी खेळ पासून ते निमकर्दा पर्यंत तेथून हातरूण ते लोहारा,अकोला पूर्व मतदार संघातील 19 गाव तसेच बाळापुर तालुक्यातील 70 गावांत भगीरथाच्या रूपानं प्रत्येक घरापर्यंत गोळ पाणी पाजण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी,महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा करून 171 कोटींचा मोठा प्रकल्प या मतदारसंघात मंजूर करून आणला हे केवळ नितीन बापू देशमुख यांच्या अथक प्रयत्नांमुळेच शक्य झाले. बघता बघता दोन वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण मतदार संघामध्ये शेकडो कोटी चे काम खेचून आणण्याचं काम सुद्धा आ.नितीन बापू देशमुख यांनी केले आहे. पातुर शहरातील विविध विकास कामांसाठी आतापर्यंत 7 कोटींची कामे पुर्णत्वास जात आहेत त्यामध्ये महात्मा फुले स्मारक सुशोभीकरण,छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण,संत श्री सिदाजी महाराज संस्थानला 50 लाखांचा भव्य सभामंडप तसेच सिमा भिंतीसाठी 01 कोटीचा निधी,शाहबाबू दर्गा येथे सुशोभीकरण साठी 02 कोटी, बाळापूर वेस ते कान्होबा चौकासाठी 25 लाख,जगदंबा देवी मंदीराचे सभामंडप व इतर कामांसाठी 01 कोटी,राधेकृष्ण मंदीर सभामंडपासाठी 15 लाख,आदीवासी समाजाच्या सभामंडपासाठी 50 लाख,मातंग समाजाच्या समाधानासाठी 50 लाख, हनुमान मंदीरासाठी 25 लाख व अन्य अशा विविध चांगल्या कामासाठी आमदार नितीन बापू देशमुख यांनी भरघोस असा निधी उपलब्ध करून इतर लोकप्रतिनिधींच्या तुलनेत स्वतःला सिद्ध करून दाखविले आहे.यासाठी म्हणून पातुर तालुका विकास मंचच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. तसेच शहरातील व तालुक्यातील राहेर,पिंपळखुटा,सस्ती,खानापुर,आगिखेड,कोसगाव,चोंढी या ठिकाणी खराब झालेले खड्डेमय रस्ते विकसित करण्यात यावे आणी वर्षानुवर्षे न संपणारी पिण्याच्या पाण्याची सुजल निर्मल जल योजना लवकरात लवकर मार्गी लावणे अशा मागण्या त्यांना पातुर तालुका विकास मंचच्या वतीने करण्यात आल्या त्यांनी ही सकारात्मक प्रतिसाद देत येणा-या काही काळात सर्व कामे लवकरच पुर्ण होतील असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी पातुर तालुका विकास मंचाचे किरणकुमार निमकंडे, रंणजीत गाडेकर,डॉ विलास हिरळकार,विजय राऊत,मधुकर राखोंडे,प्रल्हाद गवई व इतर मान्यवर उपस्थित होते.