सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : माहेरावरून व्यवसाय करण्यासाठी वारंवार पैशाची मागणी करून जिवाने मारण्याची धमकी देत सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची घटना मेहकर तालुक्यातील रायपुर शिवारात दिनांक 23 जून रोजी सकाळी दहा वाजेदरम्यान घडली. डॉक्टर अनिल भास्कर मापारी यांनी त्याची बहीण सौ अरुणा अनिल वाहेकर हिला सासरकडील मंडळी पती अनिल साहेबराव वाहेकर . देर प्रमोद साहेबराव वाहेकर . साहेबराव वाहेकर . व सासू मंडाबाई वाहेकर यांनी माहेरा वरून व्यवसाय करण्यासाठी वारंवार पैशाची मागणी करून तिला लग्नामध्ये कमी हुंडा दिला आहे. असे म्हणून जीवाने मारण्याची धमकी देत असत व तिला घरातून नेहमी काढून देते होते. त्यांच्या या त्रासाला कंटाळून अरुणा अनिल वाहेकर हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली . असे तक्रारीत नमूद केले आहे. जानेफळ पोलिसांनी पंचनामा करून आरोपीविरुद्ध १४ /२०२२ कलम ३०४ (ब)३०६. ५०६.३४ भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार राहुल गोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस अमोल बोर्डे. बीट जमादार ढवळे. व रायटर शेळके करीत आहेत.











