सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : जानेफळ जिल्हा परिषद सर्कल मधील गावोगावी बसविण्यात आलेले एलईडी सोलर लाईट व पोल च्या अंदाजपत्रकामध्ये भ्रष्टाचार संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी मेहकर पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी यांनी संयुक्त समिती चौकशी गठित केली असून खरंच दोषींवर कारवाई होणार का? असा प्रश्न जिल्हा परिषद सर्कल मध्ये चर्चिला जात आहे. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार मौजे हिवरा खुर्द व जानेफळ सर्कलमध्ये बसविण्यात आलेल्या संपूर्ण एलईडी सोलर लाईट व पोलसह खर्चाचा अंदाज पत्रक व मूल्यांकन बाबत तक्रार शिवाजी भगवान ढवळे यांनी केली होती. जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत संबंधित कंपनीकडून एलईडी लाईट. स्ट्रीट लाईट. संदर्भात निविदा व सदर कंपन्याचा मूळ अंदाजपत्रक प्रत्येक पोलसह सोलर एलईडी लाईट खर्चाच्या अंदाजपत्रकात व्यतिरिक्त कमी दर्जाचे दिवे शासनाकडून उच्च दर्जाचे बिल गोळा करून जास्त पैसा काढून शासनाची दिशाभूल केल्याची 3 जानेवारी रोजी तक्रार केली होती. जानेफळ सर्कल व हिवरा खुर्द येथे खूप मोठा भ्रष्टाचार दिसून येत असल्याने या भ्रष्टाचाराची चौकशी सात दिवसाच्या आत करण्यात यावी अन्यथा आठव्या दिवशी हिवरा खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते पंचायत समिती मेहकर दालनात मंडप टाकून आमरण उपोषण करणार असल्याचे पत्रकात केले होते. सदर पत्राची दखल घेऊन गट विकास अधिकारी मेहकर यांनी संयुक्त चौकशी नेमून संयुक्त समिती गठीत केली आहे. यामध्ये विस्ताराधिकारी पंचायत समिती एस .एस गवई. शाखा अभियंता पी .सी चव्हाण व ग्राम विकास अधिकारी जे .जे आरू यांची नेमणूक केली आहे. विषयाचे अनुषंगाने चौकशी करून आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल सादर करून उचित कार्यवाही प्रस्थापित करावी असे गट विकास अधिकारी यांनी केले आहे.

