किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : स्थानिक डॅा.एच.एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात भारतीय संविधान सभेचे जेष्ठ सदस्य तथा श्री.शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा १२३ वा जयंती महोत्सव ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणून दि. २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत उत्साहात संपन्न झाला त्या समारंभाच्या समारोपीय तथा प्रमाणपत्र वितरण व आवार भिंतीचे अनावरण, विद्यार्थी भांडार गृहाच्या उद्घाटकीय समारंभाचे प्रमुख अतिथी म्हनुन बोलतांना प्रा विश्वनाथ कांबळे यांनी वरील प्रतिपादन केले. याप्रसंगी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, प्रमुख अतिथी आमदार किरण सरनाईक, गुलाबराव पाटील ताले, सदस्य, महाविद्यालय विकास समीती, तथा श्री.शिवाजी संस्थेचे आजीव सदस्य,कृषीभूषण दादाराव देशमुख, सदस्य, महाविद्यालय विकास समीती, तथा श्री.शिवाजी संस्थेचे आजीव सदस्य, विलासराव हरणे, सदस्य, शाळा समिती श्री शिवाजी हायस्कूल, अकोला, विनायकराव पुंडकर श्री शिवाजी संस्थेचे आजीव सदस्य, अशोकराव देशमुख श्री शिवाजी संस्थेचे आजीव सदस्य, डॅा के व्ही देशमुख, महाजन, जयसिंग राठोड, प्रभारी प्राचार्य डॅा किरण खंडारे उपस्थीत होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते आवार भिंतीचे अनावरण आणि विद्यार्थी भांडार गृहाचे उद्घाटन झाले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पन करण्यात आले.त्यांनतर महाविद्यालायाच्या संगीत विभागाच्या वतीने प्रा. मंगेश राऊत आणि संच यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॅा किरण खंडारे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी गेल्या ९ महिण्याच्या प्रगतीचा आढावा आणि भविष्यकालीन योजना मांडल्या त्याच बरोबर कार्यकारीणी चे वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत असल्यामुळे महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास होतो आहे.असे उद्गार याप्रसंगी काढले.त्यानंतर महाविद्यालयाच्या पहिल्या बॅच चे माजी विद्यार्थी माजी प्रा. विश्वनाथ कांबळे यांनी सांगीतले की आजच्या विद्यार्थ्यांनी भाऊसाहेब आणि बाबासाहेब यांच्या विचारांची कास धरुन वाटचाल केली पाहीजे हाचं जीवनाचा सक्सेस पासवर्ड आहे. भाऊसाहेबांचे सर्वचं स्तरातील कार्य हे अलौकिक आहे.म्हनुन शिक्षणसंस्थेतुन वैज्ञाणिक दृष्टी असणारे विद्यार्थी घडले पाहीजे हि काळाची गरज आहे.आज महाविद्यालयात ज्या सोयी सुविधा आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहीजे. जग बदलत आहे जगाची भाषा नवनवीन कोर्सेस आपण शिकले पाहीजे. ग्रामीण आणि शहरी हा भेद न ठेवतां स्पर्धेसाठी स्वत:ला तयार ठेवले पाहीजे.असे प्रतिपादन केले.अध्यक्षीय भाषनात दिलीपबाबू इंगोले म्हणाले की,भाऊसाहेबांनी जातीधर्माच्या पलीकडे जावुन कार्य केले म्हनुन ते जनसामान्यांच्या मनात आहेत. छत्रपती शिवरायांचे विचार आणि डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची साथ नेहमीचं सोबत ठेवुन भाऊसाहेब वाटचाल करीत होते.
काही माणसं एकट्यानं मोठी होतात, काही माणसांना समाज मोठं करतो, तर काही माणसांमुळं समाज मोठा होतो. ज्या माणसांमुळे समाज मोठा झाला अशी माणसं म्हणजे महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या परंपरेत अभिमानानं ज्या नावाचा उल्लेख करावा लागतो ते नाव म्हणजे शिक्षणमहर्षी, कृषिरत्न डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे होय.इथल्या शेतकर्यांच्या दैन्यावस्थेला नेमकेपणाने ओळखून त्यांचा स्तर सर्वार्थाने उंचावण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर आणि विवेकवादी दृष्टिकोनातून विचार करणारे समाजसुधारक म्हणून आजची पिढी भाऊसाहेबांकडे अतीव श्रद्घेनं आणि आदराने पाहते हेचं कर्तुत्व आजच्या पिढीला समोर न्यावयाचे आहे. असे प्रतिपादन केले.त्यानंतर जयंतीउत्सवानिमित्त आयोजीत सर्व स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रणामपत्र देवुन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन प्रा अनिल देशमुख व प्रा राहुल माहुरे यांनी केले.मुख्य कार्यक्रमाचे संचालन जयंती उत्सवाचे समन्वयक डॅा रोनिल आहाळे यांनी तर आभारप्रदर्शन सह- समन्वयीका डॅा दिपाली घोगरे यांनी केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व आजी व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.