गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा । एमबीबीएस शिक्षणासाठी रशियाला जाणाऱ्या तेल्हारा येथील रहिवासी सोज्वल वैराळेचा अकोला येथे सत्कार केला. या वेळी नागपूर हायकोर्ट येथील अॅड. दीपक पाटील यांनी सर्वप्रथम सोज्वलवर संस्कार करणारे तिचे आई वडिल डॉ. अनंत भास्कर वैराळे आणि सारिका वैराळे यांचा सत्कार केला. परदेशात देशाची आणि आईवडिलांची मान उंचावेल असे आचरण ठेवावे. भरपूर अभ्यास करुन ध्येय गाठावे, असे मनोगत कौलखेड येथील मराठा सेवा संघाचे सदस्य, ई. पी. एफ विभागीय अध्यक्ष देवराव हागे यांनी सत्कार करताना व्यक्त केले. या सत्कार समारंभाला अॅड. एस. बी. पाटील अकोला, अॅड. दीपक पाटील नागपूर, देविदास पाटील, जोत्स्ना पाटील, पुनम पाटील, वर्षा पाटील, प्रसाद गावंडे, दत्ता पाथ्रीकर, सुप्रभा वैराळे, सार्थक वैराळे, कल्पना हिंगणकार यांची उपस्थिती होती.










