अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर (दि.०६ जानेवारी ;२०२२)- स्थानिक डॅा एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॅा किरण खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी Importance of Communication skill in English & career guidance या विषयावर प्रमुख वक्ते आणि उद्घाटक म्हनुन बोलतांना शशिन नाभरे यांनी वरील प्रतिपादन केले.याप्रसंगी विचार मंचावर सारिका नाभरे, डॅा. संजय खांदेल, डॅा व्ही जी वसु उपस्थीत होते. मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पन करण्यात आले.आपल्या सविस्तर भाषणात प्रमुख वक्ते म्हनुन बोलतांना मा शशिन नाभरे पुढे म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकायचे असेल तर इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नाही. कारण ती जगाची भाषा आहे. आणि अत्यंत सोपी आणि सहज समजणारी भाषा आहे. आपल्याकडे उगाचं भाषा कठीण आहे असा गैरसमज निर्माण करुन दिलेला आहे.तो आपल्याला तोडायचा असुन त्याविषयीची भिती मनातुन नाहीसी करायची आहे. त्यासाठी महाविद्यालयात येवुन रोज नियमीत वर्ग करण्याची गरज आहे. कारण त्यातुन चं आपला व्यक्तीमत्व विकास होतो. असे प्रतीपादन केले.यानंतर मा. सौ सारिका नाभरे यांनी व्यक्तीमत्व विकासावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी स्वत:ला ओळखले पाहीजे. स्व ची ओळख फार महत्वाची आहे. वाचन करा कारण वाचाल तरचं स्वत:ची मते तयार कराल, चर्चा कराल यातुनचं आत्मविश्वास निर्माण होतो. आपल्या मधील कमतरता ओळखा आणि त्याचे रुपांतर आपल्या शक्तीमध्ये करा. भविष्यकालीन वाटचालीसाठी योजना तयार करा.आणि यशस्वी व्हा हा मूलमंत्र दिला.अध्यक्षीय भाषनात प्राचार्य डॅा किरण खंडारे म्हणाले की, नवीन काय करता येईल याचा विचार विद्यार्थ्यांनी सतत केला पाहिजे त्याचप्रमाणे महाविद्यालय विद्यार्थी केंद्रीत उपक्रम सातत्याने राबवत असते.असे सांगुन गेल्या ९ महिण्याच्या प्रगतीचा आढावा आणि भविष्यकालीन योजना मांडल्या पुढे बोलतांना ते म्हणाले की,विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी इंग्रजी वर्तमान पत्र वाचले पाहीजे, इंग्रजी पुस्तके वाचली पाहीजे, इंग्रजी बातम्या ऐकल्या पाहीजे, इंग्रजी लिहण्याचा सराव केला पाहीजे, सहजसुलभ व आनंददायी पद्धतीने किंवा हसतखेळत विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा शिकावी, भाषेचा सराव करावा व यातूनचं कळत नकळत इंग्रजी भाषेच्या उपयोजनेचा आत्मविश्वास प्राप्त होईल असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे संचालन डॅा दिपाली घोगरे यांनी तर आभार प्रदर्शन डॅा संजय खांदेल यांनी केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कोवीड-१९ चे नियम पाळुन उपस्थित होते.











