महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१४:-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श आजच्या स्त्रियांनी अंगी बाळगावा,असे आवाहन युथ अगेन्स्ट करप्शन ॲंड बहुउद्देशीय सोशल वर्क फाऊंडेशन तथा विश्व ज्ञानरंजन वाचनालय भद्रावतीचे अध्यक्ष विक्रांत बिसेन यांनी केले.ते येथील बिसेन कम्प्युटर एज्युकेशन द्वारा आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, संसारिक, वैचारिक, साहित्यिक व मानवतावादी अशा विविध कार्याचा प्रत्येक स्त्रीने अभ्यास आणि विचारमंथन करून आपल्या आणि इतरांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी मनोभावे कृतिशील प्रयत्न करणे गजरेचे आहे. यावेळी श्री. साई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका रश्मी राजूरकर, बिसेन कम्प्युटर एज्युकेशनच्या सहाय्यक समन्वयक हर्षदा हिरादेवे व सर्व संस्थेत शिकणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी ज्योती डोर्लीकर , शितल डाकरे , स्नेहा कांबळे , पुनम दुर्गे , नितीन शर्मा , वेदांत रायपूरकर , निशांत बहाडे , राहुल कदम , सौजन्या सुक्का , आचल दाते , अश्विना पठाडे ,सानिया कांबळे , कांचन पेटकर ,कीर्ती साव ,मिनाक्षी असमपल्लीवार , योगिता चिडे , पूर्वा वरारकर , वृषाली पाझारे , अनिशा वाडेकर यांची उपस्थिती होती. यावेळी अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन नेहा कुरेकार यांनी केले.