अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने बाळशास्त्री जांभेकर यांना पातुर तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.पातुर येथील जय गजानन बिछायत केंद्राच्या समोर या कार्यक्रमाचे आयोजन 11 जानेवारी रोजी करण्यात आले होते. याप्रसंगी पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार प्राध्यापक सि. पी. शेकूवाले यांचा सत्कार शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला आहे.यावेळी मराठी पत्रकार संघाचे पातुर तालुका अध्यक्ष देवानंद गहिले, ज्येष्ठ पत्रकार राजारामजी देवकर, संजय गोतरकर, साजिद हुसेन सर, रमेश निलखन, सय्यद हुसेन बाबू,अमोल करवते, अमोल कांबळे, राहुल धाडसे, दिलीपराव खाकरे, आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती