अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर तालुक्यातील शिर्ला येथील शिवानी खान यांची शिवसेनेच्या उपतालुका प्रमुख म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे.सदर निवडीचे पत्र आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते शिवा नीलखन यांना नुकतेच देण्यात आली आहे.युवा सेनेला पातुर तालुक्यात बळकटी यावी याकरिता युवा नेतृत्व म्हणून जिल्हा प्रमुख युवासेना प्राध्यापक दीपक भोसले तालुकाप्रमुख सागर रामेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.यावेळी पातुर पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मीताई डाखोरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र मुर्तडकर, शहर प्रमुख अजय ढोणे माजी तालुका प्रमुख शिवसेना नेते गजानन शिंदे, पंचायत समिती सदस्य एडवोकेट सुरज झडपे गोपाल ढोरे, अनिल इंगळे, यांच्यासह युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती पातुर तालुक्यात युवा सेनेच्या उपाध्यक्षपदी शिवा निलखन यांची निवड झाल्याने पातुर तालुक्यात त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात आले आहे.