शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि
अकोट : बोर्डी नागास्वामी महाराज मंदिर बोर्डी येथे आज स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त श्री.नागास्वामी इंग्लिश स्कूल बोर्डी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उमरा जि.प.सदस्य प्रकाश आतकड,नागास्वामी संस्थानचे अध्यक्ष मनोहर गये,सागर ढोले,प्रशांत धर्मे,देवानंद भटकर,देवानंद खिरकर पत्रकार हे होते.यावेळी नागास्वामी इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी जय सागर ढोले,व अथर्व प्रशांत धर्मे हे दोन्ही विद्यार्थी एम बी बी एम साठी पात्र झाले त्या निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.सागर ढोले व प्रशांत धर्मे यांचा सुद्धा सुरेश गायकवाड यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.नागास्वामी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनीं भाषणे दिली.प्रास्ताविक शाळेचे संस्थापक सुरेश गायकवाड तर सूत्रसंचालन वर्षा बुले मॅडम यांनी केले.यावेळी दिलीप रंधे,गोकुळ लटकुटे,राजेश खिरकर,समाधान चंदन,मो.साजिद,विनोद गये,महिला बचत गटाच्या महिला,वर्षा बुले मॅडम,आरती गायकवाड मॅडम,सीमा मॅडम,संगीता राऊत मॅडम,वैष्णवी लाहोरे मॅडम,पायल आतकड मॅडम,प्रतीक्षा नागोसे मॅडम,पल्लवी वरणकार मॅडम,जयश्री मॅडम उपस्थिती होत्या.लोकसंचालीत साधन केंद्र अकोटचे ववस्थापक अमर इंगळे यांनी महिलांना प्लॅस्टिक निर्मुलन व स्त्रीभ्रूण हत्या विषयी मार्गदर्शन केले.