किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंचायत समिती पातुर तर्फे वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये तुळसाबाई कावल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत सर्वच बक्षिसे आपल्या विद्यालयाला मिळवून दिली. समग्र शिक्षा जिल्हा कार्यालय शिक्षण विभाग जिल्हा परिषद अकोला तर्फे आयोजित स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन पंचायत समिती स्तरावर ती दिनांक 4 जानेवारी 2022 ला करण्यात आले होते. ही स्पर्धा पंचायत समिती मार्फत तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथे आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली होती गट ब मध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी करिता विषय देण्यात आले होते त्यामध्ये तालुक्यामधून जवळ जवळ 34 शाळांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. भाषणाची विषय गट क्रमांक ब मध्ये ‘सावित्रीबाई फुले एक थोर समाज सुधारक’ आणि ‘माझे संविधान माझा अभिमान’ या विषयावर प्रखर मत मांडून स्पर्धकांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यामध्ये तुळसाबाई कावल विद्यालयाच्या विद्यार्थिनी प्रथम क्रमांक वैष्णवी कमलदास राठोड वर्ग 9वा, द्वितीय क्रमांक स्वरा राजेंद्र ताले वर्ग 9वा आणि तृतीय क्रमांक तन्मय दिनेशराव थोरात वर्ग 6 वा या विद्यार्थ्यांनी सर्व बक्षिसे तालुका स्तरावर कावली आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरीय वकृत्व स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षकांना आणि आपल्या आई वडिलांना दिले.सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक श्री विजयसिंह गहलोत व्यवस्थापक बेरार एज्युकेशन सोसायटी पातुर ,स्नेहप्रभादेवी गहिलोत सचिव ,प्राचार्य एस बी ठाकरे, श्री अंशुमनसिंग गहिलोत ,श्री अजितसिंग गहिलोत , श्री जगमोहनसिंह गहिलोत यांनी केले.