वृषभ दरोडे तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव तालुक्यातील येत असलेल्या परसोडा गावामध्ये एका 73 वर्षीय पीडित महिलेवर शारीरिक अत्याचार करत एका नराधमाने दमदाटी केल्याचा प्रकार वडकीपोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परसोडा गावामध्ये उघडकीस आला. याप्रकरणी पीडित महिलेने दिनांक 31 डिसेंबर रोजी वडकी पोलीस स्टेशन मध्ये संशियत सुनील गुलाबराव कोल्हे वय तीस वर्ष राहणार परसोडा यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पीडित महिला ही 30 डिसेंबर रोजी चार वाजताच्या सुमारास गावातील नाल्याजवळ लाकडे गोळा करण्यास गेली असता आरोपी सुनील कोळी यांनी पीडित महिलेच्या जवळ येऊन बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला यात महिलाही जखमी झाली असल्याने तिचा शासकीय रुग्णालय यवतमाळ भरती करून तिच्यावर उपचार सुरू आहे याप्रकरणी वरची पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. अशी माहिती आज दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी देण्यात आली आहे पुढील तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे


