गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये
३० डिसेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये वार्षिक निरीक्षण निमित्ताने भेट दिली. वार्षिक निरीक्षण आटोपल्यानंतर पोलिस स्टेशन अंतर्गत तेल्हारा शहरात कोविड १९ कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शाकंभरी मोबाईल शॉपी संचालक रवि निरंजन पाडीया यांनी कोरोना काळात मोफत माक्स.सेनीटायझर.गरजुंना धान्य वाटप तसेच टॉवर चौकात गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी मोफत सीसीटीव्ही कॅमेरे लावून देणारे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे.रवी निरंजन पाडिया यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी खोकर, ठाणेदार ज्ञानोबा फड व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.