पुणे : कुख्यात गुन्हेगारांना (Criminals) पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस दलावर गुन्हेगारांनी गोळीबार (Firing) केल्याची घटना समोर आली आहे.या घटनेदरम्यान पोलिसांनीदेखील क्रॉस फायरिंग करत गुन्हेगारांच्या दिशेने दोन राउंड फायर केले. या दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन गुन्हेगार पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पण पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Police Commissioner Krushna Prakash ) यांनी धाडस करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे कृष्ण प्रकाश यांच्या धाडसामुळे आरोपींना जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं.
नेमकं प्रकरण काय? पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात 18 डिसेंबरला योगेश जगताप नावाच्या व्यक्तीची भरदिवसा दहा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी जगताप यांची हत्या करुन आरोपी गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण हे फरार झाले होते. मागील नऊ दिवसांपासून या आरोपींचा शोध घेणाऱ्या पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांना अखेर आरोपींची माहिती मिळाली. आरोपी खेड तालुक्यातील पाईट-कोये गाव परीसरात फिरत असल्याचं लक्षात आलं.
विशेष म्हणजे त्यांच्यासोबत तडीपार गुंड महेश मानेही असल्याचं पोलिसांना समजलं. या तिघांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी ते राहत असलेल्या एका शेतालगतच्या घराच्या बाजूने सापळा रचला आणि आरोपींना चहू बाजूने घेरलं. पोलीस-गुंडांमध्ये चकमक, अखेर आरोपींच्या मुसक्या आवळल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठीची ही मोहीम खुद्द पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नेतृत्वात सुरु होती. त्यानुसार प्रकाश यांचा इशारा मिळताच पोलीस आरोपीच्या दिशेने पुढे गेले.
मात्र तेवढ्यात आरोपींना चाहूल लागली आणि ते घराबाहेर येऊन जमिनीवर रेंगाळत पळून जाऊ लागले. मात्र ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. पोलीस त्यांना पकडण्यासाठी पुढे गेले असता आरोपींनी त्यांच्याकडील पिस्तूलातून दोन गोळ्या झाडल्या. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही दोन राउंड फायर केले आणि सगळे आपल्या पोजिशनवर गेले.
यावेळी आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळू लागले. फडणवीसांचा सवाल, ठाकरे सरकारचा निर्णय, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार त्याचवेळी आयुक्त कृष्ण प्रकाश त्यांच्यासमोर आडवे आले. त्यांनी बाजूला पडलेल्या एका मोठ्या झाडाचा ओंडका पळणाऱ्या आरोपींच्या छातीवर टाकला. झाडाच्या ओझ्याने तीनही आरोपी खाली पडले आणि वेळेचं भान राखत मोहिमेत सहभागी असलेल्या इतर पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांनी आरोपींना जेरबंद केलं.
या दरम्यान पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि गुन्हेगारांमध्ये मोठी झटापट झाली आणि त्यात प्रकाश हे किरकोळ जखमी झाले. आरोपी हत्यारबंद असतांना देखील प्रकाश यांनी जीवाची पर्वा न करता ते निडर वृत्तीने त्यांच्यासमोर जाऊन उभे ठाकले. त्यांनी आरोपींवर गोळीबार न करता समय सूचकता बाळगून तिघांनाही जिवंत पकडण्यात यश मिळवलं. आता आरोपी गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण याने योगेश जगताप याची हत्या का केली, त्या हत्येमागे काही राजकीय कट होता का? या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे आरोपीच्या पोलीस कस्टडी दरम्यान मिळतील, अशी अनेकांना अपेक्षा आहे.


