बुलडाणा दि.27 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावे. फलोत्पादन तसेच कृषि क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या संशोधन संस्था, भारतीय अनुसंधान परीषदे अंतर्गत संशोधन संस्था, कृषि विज्ञान केंद्र पुणे, नगर व सोलापूर येथे कार्यरत आहे. फलोत्पादन व प्रक्रिया क्षेत्रात काम करणारे शेतकरी अभ्यास दौरा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. पाच दिवसीय प्रशिक्षण दौऱ्यासाठी शासनाच्यावतीने अनुदानावर सहलीसाठी इच्छूक शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावे. प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत राबविलेल्या उपक्रमाची पाहणी करून शेती क्षेत्रात उत्पन्न वाढीच्या संधीचा अभ्यास शेतकऱ्यांना करता येणार आहे. फळबाग लागवड, कांदाचाळ, संरक्षीत शेती, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया याबाबत लाभ घेतलेल्या तसेच लाभ घेवू इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डांबरे यांनी केले आहे. अर्जदारासाठी अटी : प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे निवड करण्यात येईल, शेतकऱ्याच्या नावे 7/12 व नमुना 8 अ असावा, वयोमर्यादा 18 ते 45 असावी, आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स असावी, पासपोर्ट आकराचा एक फोटो असावा.