बुलडाणा, दि.27 : ज्या खाजगी संवर्गातील दुचाकी, चारचाकी, तीन चाकी वाहनांची वयोमर्यादा नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष झालेली आहे. अशा वाहनांची नोंदणी 15 वर्षानंतर विधी ग्राह्य नाही. वाहनांच्या नोंदणीचे नुतनीकरण मोटार वाहन नियम 1989 अन्वये अनिवार्य आहे. अन्यथा विधीग्राह्यता संपलेल्या वाहनांवर कार्यालयाचे तपासणी पथकामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच ज्या खाजगी वाहनांना नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष पूर्ण झालेली आहे व परिवहन संवर्गातील मालवाहतूक करणारे लोडींग ॲटो, टेम्पो, ट्रक, बसेस यांना वयोमर्यादा 8 वर्ष पूर्ण झाली आहे. अशा वाहनांना पर्यावरण कर भरणे अनिवार्य आहे. विहीत कालावधीत पर्यावरण कर भरणा न केल्यास 2 टक्के प्रती महिना व्याज आकारण्यात येते. ज्या वाहनांचा पर्यावरण कर थकीत आहे, अशा वाहन धारकांनी तातडीने थकीत कराचा भरणा करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे भरारी पथकाद्वारे होणारी कार्यवाही टाळावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.










