बुलडाणा दि.27 : भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय व युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा कॅच द रेन अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे. कॅच द रेन अभियाना संदर्भातील जनजागृती पोस्टर्स चे विमोचन जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांच्याहस्ते 24 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, नेहरु युवा केंद्राचे लेखापाल व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक गणेश सुर्यवंशी उपस्थित होते. या कॅच द रेन अभियानाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जतन करण्याबाबत नेहरु युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा स्वयंसेवक व युवा मंडळाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती अजयसिंग राजपूत यांनी यावेळी दिली.