सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
अनसिंग :- येथून जवळच असलेल्या उमरा शमशुद्दीन ग्रामपंचायतीच्या सदस्य निर्मला सुरेश जाधव यांना तीन अपत्य असल्याने ग्रामपंचायत अधिनियमानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशाला आव्हान देणारी त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 10 डिसेंबर रोजी रद्द केली त्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेश कायम राहून त्यांचे सदस्यत्व रद्द झाले निर्मला सुरेश जाधव यांना तीन अपत्य असल्याने उमरा शमशुद्दीन येथील गजानन महादेव जाधव यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (1)(1- ज) प्रमाणे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याबाबत वाशिमच्या जिल्हाधिकार्यांकडे तक्रार दाखल केली होती त्यावर सुनावणी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी 14 डिसेंबर 2017 रोजी निर्मला सुरेश जाधव यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केल्याचा आदेश पारित केला होता निर्मला जाधव यांनी या आदेशाला विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती त्यांनी त्यांचा अपील फेटाळून लावत जिल्हाधिकार्यांचा आदेश कायम ठेवला त्यामुळे निर्मला जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली या प्रकरणातही उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 10 डिसेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी वाशिम यांचा आदेश कायम ठेवून ग्रामपंचायत सदस्य निर्मला सुरेश जाधव यांची याचिका खारीज केली परिणामी निर्मला सुरेश जाधव यांचे ग्रामपंचायत उमरा शमशुद्दीनचे सदस्यत्व रद्द झाले











