सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : जिल्ह्यातील अती दुर्गम व अतिमागास दरीखो-यात वसलेला मागासवर्गीय भाग जो नेहमी नक्षल चळवळीने पछाडलेला तसेच विकासापासुन कोसो दुर असलेला भाग म्हणजे उप पोलीस स्टेशन देचलीपेठा.या परिसरातील अनेक नागरिक कोणत्याही शासकिय योजनापासुन वंचीत राहु नये याकरिता नेहमी तत्पर असलेले देचलीपेठाचे प्रभारी अधिकारी सुधीर साठे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन विविध कल्याणकारी उपक्रमाचे आयोजन केले. त्यांनी प्रत्येक वेळी राबविलेल्या या उपक्रमामुळे देचलीपेठा परिसरातील हजारो आदिवासी बांधव अनेक योजनांचा लाभ घेत आहेत.त्या अनुसंगाने दिनांक -11 डिसेंबर रोजी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या संकल्पनेतुन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली उप पोलीस स्टेशन देचलीपेठा व उपजिल्हा रुग्णालय अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.उपपोस्टे देचलीपेठाच्या वतीने हद्दीतील आदिवासी बांधवाकरिता अशा विविध कल्याणकारी उपक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे उप पोलीस स्टेशन देचलीपेठा येथे दि.11 डिसेंबर रोजी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. होते. सदर शिबीराचे उदघाटन डाँ. बिस्वास वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पेठा यांचे अध्यक्षतेखाली स्वातंत्र सेनानी बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन एल. एन. कोम सहा. कमांडट,सिआरपीएफ चे अधिकारी नोबिन सिंग,डॉ.प्रणिता नन्नावरे वैदयकीय अधिकारी उप जिल्हा रुग्णालय अहेरी,रश्मी मारगमवार समुपदेशक अहेरी,प्राध्यापक बोरकर आश्रमशाळा पेठा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पेठा येथील सर्व कर्मचारी यांचे उपस्थितीत उदघाटन सोहळा पार पाडला. रक्तदानशिबीराविषयी वैद्यकीय अधिकारी यांनी उपस्थित नागरिकांना रक्तदान केल्याने सामाजिक जिवनात किती महत्व आहे.तसेच रक्तदान केल्याने किती समाधान मिळते.याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुधीर साठे यांनी गडचिरोली पोलीस दल यांचे मार्फतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजनाचे लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच उप पोलीस स्टेशन देचलीपेठाचे एसआरपीएफ व सीआऱपीएफ चे अधिकारी अमंलदार यांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याकरिता सहभाग नोंदवा अशा प्रकारचे मनोगत व्यक्त करुन शिबीराचे आभार प्रदर्शन केले.रक्तदान शिबीरात जिल्हा पोलीस चे पोलीस उपनिरिक्षक गोविंद खटींग,पोलीस उपनिरिक्षक भारत वर्मा व पोलीस अंमलदार व एसआरपीएफ व सीआरपीएफ चे अधिकारी,अंमलदार तसेच शासकीय आश्रमशाळा पेठा येथील शिक्षकवृंद असे एकुन 20 रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच या हद्दीतील अनेक नागरीकांचे एकुन 67 ई श्रम कार्ड काढुन देण्यात आले. तसेच प्राथमिकआरोग्य केंद्र पेठा येथील वैद्यकीय अधिकारी यांनी शिबीराकरिता उपस्थित असलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.तसेच कोरोना लसीकरण विषयी जनजागृती करण्यात आली.सदर रक्तदान शिबीराकरिता उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी,पोलीस उपनिरिक्षक गोविंद खटींग,पोलीस उपनिरिक्षक भारत वर्मा व पोलीस अंमलदार व एसआरपीएफ,सीआरपीएफ चे अधिकारी अंमलदार यांच्या मोलाच्या सहकार्याने रक्तदान शिबीर यशस्वी करण्यात आले.

