किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : येथे होमगार्ड जिल्हा समादेशक डॉ मोनिका राऊत यांच्या आदेशावरून. दी 13 डिसेबर रोजी वर्धापन दिन समारोपीय कार्यक्रम पातुर होमगार्ड पथका कडुन होमगार्ड संघटनेचा ७५ वा वर्धापन दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनाचे उद्घघाटन दि.11डिसेंबर रोजी स्वच्छता अभियान राबवून करण्यात आले.व शहिद जनरल बिपीन रावत सह अकर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तर समारोपीय कार्यक्रम दी 13 डिसेंबर रोजी करण्यात आला. यावेळी पातुर होमगार्ड पथकाने मुख्य मार्गावरुन पथसंचलन केले.पातुर पोलीस स्टेशनच्या परीसरात पातुर पथकाने घेतलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणेदार हरीष गवळी ,चान्नी पो स्टे चे ठाणेदार राहुल वाघ,तालुका समादेशक संगीता इंगळे,विजवितरण कंपनीचे संतोष खुमकर ,वैद्यकीय अधीकारी डाॅ.रेवाळे,पोलीस पाटील निरंजन कढोणे,सिने कलाकार गजानन पोपळघट माजी समादेशक रूस्तम गवई, ,पत्रकार संतोषकुमार गवई, जेष्ठ पत्रकार प्रदीप काळपांडे,अँड महेंद्र मृग,शिवकुमार बायस,सेवानिवृत्त पि एस आय गंगाधर चौधरी मंचकावर उपस्थीत होते.यावेळी मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी सैनिकांना योग्य मार्गदर्शन केले.वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रला पत्रकार शेख कुद्दुस, दुले खान,अन्वर भाई, निशांत गवई ,प्रमोद कढोणे,श्रीकृष्ण शेगोकार, किरण निमकंडे,स्वप्नील सुरवाडे,सैय्यद साजीद,सह पातुर तालुक्यातील सर्व महीला पुरुष होमगार्ड उपस्थीत होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक समादेशक संगीता इंगळे यांनी केले.तर संचालन सैनीक निलेश नाकट,सैनीक विठ्ठल ढगे यांनी केले.तर आभार प्रर्दशन महीला होमगार्ड रविणा अंभोरे यानी केले.या पातुर पथकातील होमगार्ड महिला पुरुष उपस्थित होते.शेवटी राष्टगीताने सांगता झाली.