अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर (दि.९ डिसेंबर;२०२१)- स्थानिक डॅा. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात कला व वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशावरून दरवर्षी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॅा. के. एस. खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पन करण्यात आले.त्यानंतर भारताचे पहिलेचं संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे अपघाती निधन झाले त्यांना श्रध्दांजली देण्यात आली.
नविन प्रवेशीत विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांचा परिचय करुन देण्यात आला.त्यानंतर आय. क्यु. ए. सी समन्वयक डॅा.संजय खांदेल, कला शाखा विभागप्रमुख डॅा व्ही जी वसु, वाणिज्य शाखा विभागप्रमुख प्रा एच ए एकबोटे, ग्रंथपाल प्रा. अतुल विखे, प्रा. दादाराव गायकवाड, प्रा राहुल माहुरे यांनी विद्यार्थ्यांना समायोचीत मार्गदर्शन केले. यावेळी विचारपिठावर प्रा. सारिका पाचराऊत, प्रा.वसंता गाडगे, प्रा महादेव टापरे, प्रा. मुकुंद कवडकर, प्रा. रवि तायडे, प्रा. समाधान चतरकर, प्रा. राऊत, प्रा.सुवर्णा गोतरकर, प्रा.कोमल ताले, प्रा.उज्ज्वला मनवर, प्रा. अमानकर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषन करतांना प्रभारी प्राचार्य डॅा. के. एस. खंडारे यांनी सांगीतले की, या कार्यक्रमाचा उद्देश नवीन विद्यार्थ्यांना नवीन वातावरणात जुळवून घेण्यास मदत करणे,
नविन प्रवेशीत विद्यार्थ्यांमध्ये संस्थेची आणि महाविद्यालयाची नैतिकता आणि संस्कृती बिंबवणे, त्यांना इतर विद्यार्थी आणि प्राध्यापक सदस्यांसोबत बंध निर्माण करण्यास मदत करणे आणि त्यांना आपल्या जीवनाच्या उद्देशाची जाणीव करून देणे हा आहे. त्याच बरोबर महाविद्यालयामधील उपलब्ध सर्व सुविधा जसे ग्रंथालय, राष्ट्रीय सेवा योजना, महाविद्यालयात उपलब्ध असलेले सर्व अभ्यासक्रम, विद्यार्थी कल्याणाच्या योजना, धोरणे त्याचप्रमाणे खेळ, कला, साहित्य, संस्कृती, मुल्यशिक्षण
याविषयीची सखोल माहीती दिली.कार्यक्रमाचे संचालन प्रा अरविंद भोंगळे यांनी तर आभार प्रदर्शन डॅा. रोनिल आहाळे यांनी केले.कार्यक्रमासाठी कला व वाणिज्य शाखेचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी कोविड चे सर्व नियम पाळुन उपस्थीत होते.