किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : उत्तर प्रदेश मधील काशी विश्वनाथ मंदिर उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून काशी विश्वनाथ मंदिर भव्यदिव्य साकारून लोकार्पण सोहळ्याच्या पुष्ट भूमीवर आज संपूर्ण देशभरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले पातुर तालुका भाजपाच्यावतीने सुद्धा आज काशी विश्वनाथ मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन पातुर येथील श्री सिदाजी व्यायामशाळेच्या प्रांगणात हनुमान मंदिरा मध्ये आरती चे आयोजन करण्यात आले व भारतीय जनता पार्टी चे सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी भारतीय सैन्य दलाचे सीडीएस बिपिन रावत व त्यांच्या सहकाऱ्यांना हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये झालेल्या दुर्दैवी मृत्यू मुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील व शहरातील कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होते व भारतीय सैन्य दलातील अधिकारी दुर्दैवी अपघातात भारतीय सैन्य दलातील सैनिक व बिपीन रावत यांच्या विषयी पातुर तालुका भाजपा अध्यक्ष रमण जैन यांनी मनोगत व्यक्त केले