किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अपात्र घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यासाठी बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांना नवनिर्वाचित प.स सदस्या सौ मनीषा ढोणे यांची पत्राद्वारे मागणी
पातुर : तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीमधील अपात्र असलेले 2389 अपात्र घरकुल लाभार्थ्यां असुन एकीकडे केंद्र सरकारने संपूर्ण देशातील बेघर अपंग अशा नागरिकांना घराचे छत्र देण्याचे ठरविले असून अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यांमध्ये 57 ग्रामपंचायत मध्ये 2389 ड. गटातील नागरिकांना जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत अपात्र ठरविण्यात आले असल्याने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ मनिषा अजय ढोणे यांनी या गटातील नागरिकांना घरकुल देणे संदर्भात जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना मागणी केली आहे त्याकरिता बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांना सुद्धा यासंदर्भात ची माहिती देऊन बेघर अपंग व गरीब नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळण्याकरीता मागणी केली आहे