गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : पोलीस स्टेशन तेल्हारा येथे आज दि. २५/११/२०२१ रोजी १७/०० वा दरम्यान ठाणेदार ज्ञानोबा नाथराव फड पो. स्टे. तेल्हारा हे आपल्या सहका-यासह तेल्हारा शहरामध्ये पेट्रोलींग करीत असतांना ठाणेदार ज्ञानोबा फड यांना गुप्त बातमी मिळाली इंदीरा नगर, तेल्हारा येथील संतोष रमेश ढाळे वय २९ वर्ष रा. इंदीरा नगर तेल्हारा ता. तेल्हारा जिल्हा अकोला हा त्याचे राहते घरात देशी कट्टा पिस्टल बाळगुन आहे अशा माहिती वरून पंचासमक्ष इंदीरा नगर तेल्हारा येथे संतोष रमेश ढाळे याचे घरी जावुन त्याचे घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे घरातुन एक लोखंडी धातुचा देशी कटटा पिस्टल, अग्नीशस्त्र त्याला ब्राउन रंगाचे फायबर ची उभ्या लाईनची पिस्टल ग्रीप असलेला किंमत अंदाजे २५,०००/- रू चा मुददेमाल जागीच मोजमाप करुण घटनास्थळ जप्ती पंचनाम्या प्रमाणे जप्त करून ताब्यात घेतला आरोपी नामे संतोष रमेश ढाळे वय २९ वर्ष रा. इंदीरा नगर तेल्हारा ता. तेल्हारा जि. अकोला याने एखादा शरीरा विरुध्द चा गुन्हा करण्याच्या उददेशाने तथा लोकां मध्ये दहशत निर्मान करण्याच्या उददेशाने विना परवाना अवैदय रित्या देशी कटटा पिस्टल, अग्नीशस्त्र घरात बाळगतांना मिळुन आल्याने पो. स्टे. ला अप नं. ४३७ / २०२१ कलम ३. २५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक जी. श्रीधर सो., मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम अकोला, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रितु खोखर मॅडम उप विभाग अकोट, यांचे मार्गदर्शनात मा. सहा. पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानोबा फड सा, तसेच पो.ना. गणेश सोळंके, पो.ना. अनिल सिरसाट, पो कॉ. जयेश शिनगारे, पो को निकेश सोळंके पोलीस स्टेशन तेल्हारा यांनी कार्यवाही केली. पुढील तपास ठाणेदार ज्ञानोबा फड करत आहेत










