गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून तेल्हारा पंचायत समितीचे सभापती उपसभापती पद रिक्त झाले होते आता शासनाने नव्याने सभापती उपसभापती पदाची निवड करण्याचे जाहीर केले असून १८ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत तेल्हारा पंचायत समितीमध्ये स्पष्ट बहुमत असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित मानला जातो परंतु तेल्हारा येथे वंचित बहुजन आघाडी जवळ ओबीसी महिला उमेदवार नसल्यामुळे २२ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत वंचित सभापती पदापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविली जात
काँग्रेसला मिळू शकते सभापतीपदाची संधी.
तेल्हारा पंचायत समितीच्या यापूर्वी झालेल्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने ऐन वेळेवर वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देऊन उपसभापती पद आपल्या झोळीत पाडून घेतले होते त्याच प्रमाणे या वेळेस सुद्धा काँग्रेसचा एकमेव उमेदवार वंचित बहुजन आघाडी कडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा सभापती पदाची संधी चालून येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते, कारण तेल्हारा येथे भाजप-सेनेचे एक मत होणार की नाही त्यामध्ये काँग्रेस समाविष्ट होणार काय? असा त्रिकोण निर्माण झाल्यामुळे सर्वांच्या संमतीने एक उमेदवार निश्चित करणे कठीण असल्याचे बोलल्या जात आहे. यामध्ये शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या सदस्या मारणार असल्याचे समजते आहे तरीसुद्धा वंचित बहुजन आघाडी काय खेळी खेळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून तेल्हारा पंचायत समितीचे सभापती उपसभापती पद रिक्त झाले होते त्यामुळे पोटनिवडणुका घेऊन ओबीसीच्या प्रवर्गासाठी राखीव जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात आल्या दरम्यान सर्व सदस्यांची निवडणूक झाल्यामुळे रिक्त झालेल्या तेल्हारा पंचायत समितीच्या सभापतीची निवड कोणत्या प्रवर्गातून करण्यात यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागितले होते सदर सभापतीपदी नामाप्र स्त्री उमेदवाराची निवड करण्यात यावी यासंबंधीचे आदेश शासनाने जिल्हा प्रशासनाकडे दिले आहेत. त्यामुळे आता तेल्हारा पंचायत समितीच्या सभापतीचे पद नामाप्र स्त्री प्रवर्गातून भरण्यात येईल सभापतीपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार असून तेल्हारा पंचायत समितीमध्ये पक्षीय बलाबल लक्षात घेता वंचित बहुजन आघाडी कडे स्पष्ट बहुमत आहे परंतु सभापती पदाच्या निवडणुकी करिता नामाप्र स्त्री उमेदवार वांचीत जवळ नसल्यामुळे वंचित ची पंचाईत झालेली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सभापतीपदाच्या निवडणुकीत काय राजिकय गणित जुळवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे परंतु १८ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकी मध्ये वंचित बहुजन आघाडी
सभापती पदाचे संभाव्य उमेदवार..
अडगाव पंचायत समिती गणाच्या कांग्रेसच्या उज्वला काळपांडे, माळेगाव बाजार पंचायत समितीच्या शिवसेनेच्या जयश्री लांडे, दहीगाव पंचायत समिती गणा मधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या जयश्री घंगाळ, हिवरखेड गणाच्या भाजपाच्या गोकुळा भोपळे या चार महिलांपैकी एका महिलेची सभापती पदाकरिता वर्णी लागणार आहे.
उपसभापती पदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार स्पष्ट बहुमत असल्यामुळे सहज निवडून आणू शकते. तेल्हारा पंचायत समितीमध्ये १६ सदस्य संख्यांपैकी वंचित बहुजन आघाडी कडे नऊ सदस्य संख्या असून शिवसेनेकडे तीन भाजपाकडे तीन व काँग्रेसकडे एक असे पक्षीय बलाबल आहे सभापती पदाकरिता वंचित जवळ नामाप्र स्त्री उमेदवार नसून शिवसेनेने जवळ दोन नामाप्र स्त्री असून भाजपकडे एक व काँग्रेसकडे एक अश्या प्रकारे चार नामाप्र स्त्री उमेदवार आहेत यापैकी सभापतीपदाच्या निवडणुकीत या चार महिलांपैकी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजप व कांग्रेस एकत्रित बसतील काय एकत्रित बसले तर सभापतिपद कुणाकडे द्यायचं हा मोठा पेच प्रसंग या तिन्ही पक्षांकडे निर्माण झालेला आहे हे येथे उल्लेखनीय.