पूज्य भन्ते राजज्योती तथा भदंत तिस्सवंस यांची उपस्थिती
गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील घोडेगांव येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या पावसाळ्याच्या दिवसात तेल्हारा तालुक्यातील घोडेगाव येथील आनंद बुद्ध विहार येथे वर्षावासानिमित्त बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण बौध्द उपासक उपासिकांसाठी करण्यात आला होता त्या ग्रंथाचा सांगता समारोप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सांगता समारोपासाठी पूज्य भन्ते राजज्योती तथा भदंत तिस्सवंस यांची उपस्थिती लाभली. पूज्य भन्ते राजज्योती हे धुत्तांगधारी भंतेजी असून त्यांनी आपल्याअमोघ वाणीतून पंचक्रोशीतील जमलेले उपासक तथा उपासिका यांना धम्मदेसना दिली.विशेष म्हणजे भन्ते राजज्योती यांची सामाजिक धम्मक्रांती अभियना अंतर्गत संपूर्ण अकोला जिल्हा पदयात्रेने पिंजून काढत आहेत. त्यातही घोडेगाव येथील आनंद बुद्ध विहार येथे भंतेजीच्या प्रवचनाने धम्माग्रंथ सांगता समरोपास जणू काही दुग्धशर्करा योग आला. संपूर्ण घोडेगावातील वातावरण तथागताच्या मंगल मैत्रीत न्हावून निघाले होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नालंदा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष देविदास दामोदर,विनोद दामोदर,सागर दामोदर, प्रभाकर दांडगे, लक्ष्मण दामोदर, भिकाजीं दामोदर, सुभाष दामोदर, विकास दामोदर, भानुदास दामोदर,मनोज दामोदर, कुंदन मनवर, संदीप दामोदर, तथा सर्व नलंदा क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी तथा महाप्रजापती महिला मंडळाच्या रमाबाई आग्रे, मंगलाबाई घ्यारे,रेखा दांडगे, संगीता आटकर,शितल दामोदर, दीपाली दामोदर, लक्ष्मी दामोदर सुनंदा दामोदर, संगीता दामोदर तथा संघनायक रवि दामोदर इत्यादी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.