गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- तेल्हारा तालुक्यात खरीप पिकांच्या सुरवातीपासूनच शेतकरी वर्गाला नुकसानीला सामोरं जावं लागलं तसेच आता सुध्दा रब्बी पिके दोन तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे धोक्यात आले आहेत.दोन तीन दिवसांपासून तेल्हारा परिसरात तापमानात वाढ बघायला मिळत आहे आणि आकाशात ढगांची हजेरी लागली आहे. वातावरणातील या बदलामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी वर्ग कमालीचा संकटात सापडणार आहे. सोयाबीन पिकाचा भयंकर फटका बसल्याने शेतकरी तुर पिकाची आस धरून बसला आहे.सद्यस्थितीत शेतात तुरीला भरपुर प्रमाणात फुल्लर लागला असुन काही शेतात एकेरी शेंग सुध्दा लागल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे वातावरणातील बदलामुळे पाऊस आल्यास किंवा ढगाळ वातावरणामुळे शेंगीवर तसेच फुल्लरावर अळी आल्यास शेतकऱ्यांच्या तुर पिकाच्या उत्पादनात भयंकर घट बघायला मिळणार यामुळेच शेतकरी चिंताग्रस्त होऊन तुरीवर महागडी फवारणी करताना दिसत आहे.समाजातुन उसणवारी करुन पैपैसा जुळवून काही शेतकऱ्यांना पिकाची निगा राखावी लागते.अशातच जर अस्मानी संकट उभे ठाकले तर शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट होते.सद्यस्थितीतील अवस्थेत शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे मार्गदर्शन करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.











