अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : दि.१७ नोव्हेंबर २१ स्थानिक डॅा एच एन सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयाचा बी. एस.सी.भाग २ चा विद्यार्थी करण संतोष मलीये ची महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेसाठी ५७ किलो वजन गटात निवड झाली आहे. कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरुन अनेक खेळ हळूहळू सुरु होत असताना आता महाराष्ट्र केसरी या मानाच्या कुस्ती स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची निवड झाली म्हनुन प्रभारी प्राचार्य डॅा.के.एस खंडारे यांनी महाविद्यालाच्या क्रीडा विभागाचे अभिंनदन केले आहे. ग्रामीण आणि डोंगरी भागातील हे महाविद्यालय असुनही खेळांच्या बाबतीत एक समृध्द वारसा महाविद्यालयाला लाभला आहे. संपूर्ण अकोला जिल्हाचं नव्हे तर महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद अशी बाब आहे. असे गौरोद्गार करण च्या या अभूतपूर्व यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी काढले त्यांनी महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॅा.के.एस खंडारे यांचे अभिंनदन केले. तसेचं उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, उपाध्यक्ष गजाननराव पुंडकर,उपाध्यक्ष डॅा रामचंद्र शेळके, संस्थेचे कोषाध्यक्ष तथा महाविद्यालय विकास समीती चे अध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, संस्थेचे कार्यकारीणी सदस्य केशवराव मेतकर, प्राचार्य केशवराव गावंडे व सर्व सन्माननीय कार्यकारीणी सदस्य यांनी तसेचं महाविद्यालय विकास समीती च्या सर्व सन्माननीय मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. आपल्या निवडीचे श्रेय आई- वडील, प्राचार्य किरण खंडारे, क्रीडा शिक्षक प्रा. सुरेश लुंगे, डॅा अनिल देशमुख व महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना दिले आहे. जिल्हाभरातुन अभिनंदनाचा वर्षाव करण वर होत आहे.











