किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
शासकीय गौणखनिज अनधिकृत वाहतूक करताना पकडले
साध्या वाहनातून जिल्हाधिकाऱ्यांची कार्यवाही
पातुर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पातुर वाशिम रोड वरील पेट्रोल पंप जवळ साध्या वाहनातून आलेल्या जिल्हाधिकारी निमा अरोरा आणि खनिकर्म अधिकाऱ्यांनी अनधिकृतपणे शासकीय गौण खनिजाची वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडले.
जिल्हाधिकारी निमा अरोरा आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी चापले मॅडम या सकाळी नऊ वाजता पातूर येथे दाखल झाल्या. साध्या बोलेरो गाडीतून आलेल्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी आकस्मिक धाड घातली आणि पातुर पेट्रोल पंपा जवळील गौण खनिजाची तपासणी करताना एम एच 28 टी 7983 क्रमांकाचा ट्रॅक्टर मुंडा आणि विना क्रमांक ट्रॉली द्वारा शासकीय मालकीच्या गौण खनिजाची विनापरवाना अनधिकृत वाहतूक करताना जिल्हाधिकारी निमा अरोरा आणि जिल्हा खरीप खनिकर्म अधिकारी चापले यांना तपासणी करताना आढळून आला असता पातुर पोलीस स्टेशन मध्ये सकाळीच जिल्हाधिकारी पकडलेल्या ट्रॅक्टर सह दाखल झाल्या. सदर ट्रॅक्टर मधील स्टोन क्रशर रेती 1 ब्रास साठी एक लाख दहा हजार रुपयांचा दंडासह ट्रॅक्टर मालकाला ट्रॅक्टर किमती एवढा वैयक्तिक जात मुचलका देण्याबाबत आदेश पारित केला.
बाभुळगाव जवळ भंडाराज मार्गे अवैध रेती वाहतूक करताना सकाळी साडेचार वाजता तलाठी डिके देशमुख मंडळ अधिकारी अमित सबनीस तलाठी नारखेडे गस्तीवर असताना आढळून आला असता
अवैध गौण खनिज घेऊन जाणाऱ्या 709 टाटा क्रमांक mh4dh4259 विरुद्ध अवैध रेती वाहतूक करताना कारवाई करण्यात आली त्याबरोबरच मालकाविरुद्ध एक लाख 16 हजार रुपये गौण खनिजाची वाहतूक केल्याबद्दल दंडा चा आदेश पारित केला
तहसीलदार दीपक बाजड यांच्या मार्गदर्शनाखाली पातुर बाळापुर रोडवर बैठे पथक आणि नायब तहसीलदार सय्यद ऐहसानोद्द्दीन ,नायब तहसीलदार विजय खेडकर यांचे फिरते पथक 24तास गस्तीवर आहे.
तलाठी ग्रामसेवक मंडळ अधिकारी कोतवाल यांची महामार्गावर रात्रंदिवस गस्त चालू आहे.
पातुर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रेती साठा नदीपात्रातून उपसला गेला आहे त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने क** पावले उचलली आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी वनिता चापले मॅडम यांनी आज पातुर तालुक्यात घातलेल्या आकस्मिक धाडीमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. त्याबरोबरच आकस्मिक धाड जिल्हाधिकारी घालतात त्यामुळे गस्ती वरील कर्मचारीही सतर्क झाले