मरदिनटोला जंगल परिसरातील घटना.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली-: महाराष्ट्र छतीसगड सिमेलगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कोटगुल ग्यारापत्तीच्या मरदिनटोला जंगल परिसरात दि.13 आक्टो रोजी सकाळी 6 ते 7 च्या सुमारास सुरू असलेल्या पोलीस-नक्षल चकमकीत 26 नक्षली ठार झाले असुन अजुनपर्यंत त्या नक्षलींचे आेळख पटलेली नाही.या चकमकीमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. अशी माहीती गडचिरोली जिल्हाचे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल यांनी दिले आहे.दि.13 आँक्टो च्या सकाळी मरदिनटोला जंगल परिसरात गुप्त माहीतीच्या आधारे नक्षल विरोधी पथकाच्या जवानांनी शोध मोहीम राबवित असतांना घनदाट जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस जवानावर गोळीबार करण्यास सुरूवात केली.याला जोरदार प्रत्युत्तर देत पोलीस जवानांनी नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला.ही चकमक दिवसभर सुरू होती.या चकमकीत 26 नक्षल्यांना कंठस्थान घालण्यात पोलीस जवानाना यश आली असुन 3 पोलीस जवान गंभीर जखमी झाले आहे.जखमींना नागपुर येथे पुढिल उपचाराकरिता हलविण्यात आले.


