महाराष्ट्र राज्य संचालक डॉ रामेश्वर बरगट
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
राष्ट्रधर्म युवा मंच (महाराष्ट्र राज्य) शाखा – पातुर च्या वतीने श्री.गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान, पातुर येथे सामूहिक बैठक पार पडली._
बैठकीचा मुख्य हेतु म्हणजे राष्ट्रसंतांचे विचार घरोघरी तसेच प्रत्येक जिल्हा, तालुका व ग्रामीण भागात कसे पोहचविल्या जातील, आणि राष्ट्रसंत विचारसरणी कशी आत्मसात करता येईल अश्या प्रकारचा हेतु आज च्या बैठकीमध्ये मांडण्यात आला._
आजची तरुण पीढ़ी ही व्यसनेच्या आहारी गेलेली असून त्यांच् भविष्य हे केवळ मातीमोल झालेल आपल्याला दिसून येते. परंतु या व्यसनेच्या आहारी गेलेल्या तरुण पीढ़ी ला व्यसनमुक्ती चे संदेश देऊन स्वतःचे जीवन नावीन्यपूर्ण चांगल्या प्रकारे कसे करता येईल तसेच गावांचा विकास कसा होईल या विषयांचे धड़े प्रत्येक तरुण व्यक्तीने आत्मसात करावे हा उद्देश्य आज च्या बैठकीत पार पडला._
आज च्या बैठकीला राष्ट्रधर्म युवा मंच(महाराष्ट्र राज्य) संचालक डॉ.श्री रामेश्वर बरगट साहेब, अकोला राष्ट्रधर्म युवा मंच( जिल्हाध्यक्ष माहोकार दादा), राष्ट्रधर्म युवा मंच (शाखा – पातुर) चे अध्यक्ष श्री. संदीप दादा गिर्हे तसेच श्री. गुरुदेव आश्रम, पातूर चे अध्यक्ष ह.भ.प तिमांडे महाराज मंगेश राऊत यांनी आपले विचार मांडले .आभार प्रदर्शन शुभम ऊगले यांनी केले.कार्यक्रमाला आकाश गाडगे, गजानन जवंजाळ,प्रज्वल भाजिपाले,संजय राऊत,संजय गोतरकार,भावेश गिरोलकार. समस्त पातूर तालुका गुरुदेव प्रेमींची उपस्थिती लाभली._


