गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करून शासन नियमाप्रमाणे सर्व सोयी-सवलती वेतन भत्ते लागू करण्यात यावे. याकरिता आज दि. 7 नोव्हेंबर पासून तेल्हारा आगारातील सर्व कर्मचारी वर्गानी राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होत.एक ही बस आगार बाहेर काढली नाही. ऐन सणासुदीच्या वेळेत ही प्रवाशी वर्गाची गैरसोय असून राज्य शासनाने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घ्यावी. अन्यथा राज्यभरात प्रवाशांची गैरसोय होऊन मोठे आर्थिक नुकसान राज्याला आपल्या विळख्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. आज एसटी बसेस च्या या संपामुळे कितीतरी भाऊ बहीण भाऊबीज विना पोरके राहिले आहेत.त्यात तेल्हारा तालुक्यातील मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय परिस्थिती त्यामध्ये खाजगी वाहनधारकांनी या झालेल्या खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवास भाडे वाढवले आहेत.अविरत सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनीही सणासुदीच्या वेळेस असे संप पुकारायला नको जेणेकरून जनतेची गैरसोय होणार नाही.
राज्य सरकारांनी सुरू असलेल्या संपाची लवकरात लवकर दखल घेऊन त्वरित कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात म्हणजे एसटी महामंडळाला अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्य शासनात विलिन केल्यास महाराष्ट्र शासन अधिक सक्षम होण्यास मदत होईल. प्रवाशी वर्ग