स्पर्धेत अनेक आदिवासी बांधवांचा सहभाग.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली/नारगुंडा-: जिल्ह्यातील अती दुर्गम भागातील आदिवासी बांधवामध्ये इतर कामा व्यतिरिक्त अनेक कला गुण सुद्धा त्यांच्या मनात लपलेले आहे. ते कला गुण मैदानात उतरविण्या करिता तसेच कला नृत्य कौशल्य दाखविण्याकरिता जिल्हा पोलिसांनी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.जिल्ह्यातील विविध पोलिस मदत केंद्रात आयोजित रेला नृत्य स्पर्धेत आदीवासी युवकांनी आपल्या कला कौशल्याचे प्रदर्शन केले.यासाठी गडचिरोली चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, समीर शेख,अनुज तारे , यांच्या संकल्पनेतुन उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागडचे डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भामरागड तालुक्यातील पोलीस मदत केंन्द्र नारगुंडा येथे भव्य रेला नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घघाटक गाव पाटील बिरजू पुंगाटी व अंगणवाडी सेविका कमला पुंगाटी यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले.यावेळी प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्र्वर लांडे, पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट स्वागत, पो.नि.यादव, सुरेंद्र साहेब तसेच सर्व पोलीस अंमलदार हजर होते.रेला नृत्य स्पर्धेत बाबलाई माता ग्रुप हलवेर यांनी प्रथम क्रमांक पटकविले. त्यांना रोख 3000 रूपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. बिरसा मुंडा संघ कूचेर यांना द्वितीय 2000 रूपये व नारगुंडा चे संघास तृतीय पारितोषिक 1000 रूपये देण्यात आले.याप्रसंगी नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्र्वर लांडे यांनी कोरोना महामारीचा प्रादुर्भावा मुळे अनेक अडचणींना सामना करावा लागला होता.कोरोना नियंत्रित झाल्याने शासनाने ताळेबंदी शिथिल केले असले तरी कोरोना बाबत गाफील राहता कमा नये.बाजारात जाताना मास्क वापरून आरोग्याची काळजी घ्यावी.65 वर्षावरील जेष्ट नागरिक व 10 वर्ष खालील बालकांनी बाजारात गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे सनीटायझर व मास्कचा वापर करुन प्रशासनाने घालुन दिलेल्या कोरोना नियमांचे काटोकोर पालन करा आरोग्याची काळजी घ्या. असे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी उपस्थित खंडी नैनवाडी,कुचेर,हलवेर,मरदहूर,नारगुंडा गावातील नागरिक उपस्थित होते.उपस्थित नागरिकांना चहा व नास्ताची सोय करुन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता प्रभारी अधिकारी सह पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर सर्व जिल्हा पोलीस,सिआरपीएपचे व पोलीस अमलदार यांनी परिश्रम घेतले.